कोठें असे सकलपंडितमुख्य भोज?
कोठें शिकंदर जगद्विजयी सुराज?
कोठें स्वधर्मपरिपालक श्री शिवाजी?
कोठें तदीय यशवर्धक वीर बाजी?॥1॥
ते राजकारणपटूत्तम धीट नाना
कोठें न का दिसति ओढित कोण त्यांना?
लोकैकवीर रणधीर मुरारबाजी
कोठें लपोनि बसले कळतें न आजी॥2॥
कोठें असे मयसभा स्पृहणीयशोभा?
निस्तेज का मज कथी पृथुची यशोभा?
धारा कुठे सकळ लोक ललामभूता?
तें हस्तिनापुर कुठे हरि ज्यास त्राता?॥3॥
गेले कुठे सुकवि जे प्रिय शारदेशी?
नेले कोणी अखिल भारतसंपदेसी?
गेले कुठे बहुल वैभव पेशव्यांचे?
व्यापार-कौशल कुठे लपलें चिनाचें?॥4॥
कां मृण्मया बनलि रोमकराजधानी?
कां ग्रीक राष्ट्रमहतीहि न येत कानी?
केले कुणी परमदीन दमास्कसाते?
नेले कुणी मिसरच्या सुयशोधनाते?॥5॥
वाजीगजादि नवरत्नसुजातकोष,
प्राचीन वैभव नितान्त तसे अशेष;
स्तंभादि वीरजयसूचक वरतुजात
केले कुणी सकल हे स्मृतिमात्र ज्ञात?॥6॥
स्थित्यंतरा करित कोण असा विदेही?
की नामरुप गुणवर्णन त्यास नाही?
छे; सर्व हे विथत; नाम तयास आहे-
तो 'काळ' जो करितसे स्थितिभेद बा हे॥7॥
कोठें शिकंदर जगद्विजयी सुराज?
कोठें स्वधर्मपरिपालक श्री शिवाजी?
कोठें तदीय यशवर्धक वीर बाजी?॥1॥
ते राजकारणपटूत्तम धीट नाना
कोठें न का दिसति ओढित कोण त्यांना?
लोकैकवीर रणधीर मुरारबाजी
कोठें लपोनि बसले कळतें न आजी॥2॥
कोठें असे मयसभा स्पृहणीयशोभा?
निस्तेज का मज कथी पृथुची यशोभा?
धारा कुठे सकळ लोक ललामभूता?
तें हस्तिनापुर कुठे हरि ज्यास त्राता?॥3॥
गेले कुठे सुकवि जे प्रिय शारदेशी?
नेले कोणी अखिल भारतसंपदेसी?
गेले कुठे बहुल वैभव पेशव्यांचे?
व्यापार-कौशल कुठे लपलें चिनाचें?॥4॥
कां मृण्मया बनलि रोमकराजधानी?
कां ग्रीक राष्ट्रमहतीहि न येत कानी?
केले कुणी परमदीन दमास्कसाते?
नेले कुणी मिसरच्या सुयशोधनाते?॥5॥
वाजीगजादि नवरत्नसुजातकोष,
प्राचीन वैभव नितान्त तसे अशेष;
स्तंभादि वीरजयसूचक वरतुजात
केले कुणी सकल हे स्मृतिमात्र ज्ञात?॥6॥
स्थित्यंतरा करित कोण असा विदेही?
की नामरुप गुणवर्णन त्यास नाही?
छे; सर्व हे विथत; नाम तयास आहे-
तो 'काळ' जो करितसे स्थितिभेद बा हे॥7॥
No comments:
Post a Comment